पवनानगर :
देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळात होत असलेल्या १२ हजार महालसीकरण अभियानाच्या अनुषंगाने आज प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे अंतर्गत ब्राम्हणोली येथे लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतिने लसीकरणासाठी आलेल्या नागरीकांना फळे वाटप करण्यात आली. आज ब्राम्हणोली केंद्रावर २८७ नागरिकांनी लसीकरण करण्यात आले.एकाच दिवशी संपूर्ण गावाला लसीकरण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, प्रभारी प्रशांत आण्णा ढोरे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, मावळ तालुका सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती कुंभार,महागाव गण भाजपा अध्यक्ष नारायण बोडके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी सेवादलेचे उपाध्यक्ष मारूती काळे, कोथुर्णे सोसायटीचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण काळे, सरपंच शाहिदास निंबळे, ग्रामपंचायत सदस्य वसंत काळे संदीप काळे,धनश्री काळे, निलम साठे,येळसेचे सरपंच सीमा ठाकर,पोलिस पाटील वैशाली काळे, माजी उपसरपंच उमेश काळे, संदिप भूतडा, अंकुश पडवळ, सोनू काळे, रामजी काळे,रामदस काळे, योगेश‌ काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येळसेचे आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र मोहिते व त्यांची सर्व टिम यांनी विशेष सहकार्य लाभलेकार्यक्रमाचे नियोजन ग्रुप ग्रामपंचायत वारु ब्राम्हणोली तसेच गावातील तरुण व ग्रामस्थांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा क्रिडा आघाडीचे सरचिटणीस संतोष दळवी यांनी केले. सुत्रसंचलन भारत काळे यांनी तर आभार शंकर काळे यांनी मानले.

error: Content is protected !!