वडगाव मावळ:
यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्री असते असा अलिखित नियम आपणाला माहित आहे. पण एक पुरूष सुद्धा एका स्त्रीला यशाच्या शिखरावर पोहचवून तिच्या आशा,आकांक्षा आणि स्वप्नांना बळ देऊ शकतो हा देखील इतिहास आहे. आपणाला प्रश्न पडला असेल अस म्हणायचे नेमके काय कारण.
त्याचे असे आहे,निगडे ग्रामपंचायतींच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाचा बहुमान सविता बबुशा भांगरे या भगीनीला मिळाला आहे. आपण राजकारण्याच्या सारीपाटात येऊ आणि जनतेचा कौल स्वीकारून सरपंच पदा सारख्या मानाच्या पदावर बसू अस सविता ताईना वाटल नव्हत किंबहुना ही अपेक्षाच त्यांनी बळागली नव्हती. साते येथील गावडे कुटूंबातील लेक,वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेऊन भांगरे कुटूंबाची सून झाली.
रोजगारासाठी भांगरे कुटुंबिय मुंबई शहरात वास्तव्यास होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या झगमगाट असलेल्या मुंबापुरीत नोकरी,व्यवसाय आणि घर हेच विश्व असलेल्या भांगरे कुटूबियांचा प्रापंचिक रहाटगाडा चालूच होता. सुस्वभावी बबूशा भांगरे आपल्या संसारात सुखी समाधानी होते. कोणाची एक नाही की,दोन नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं हेच त्यांचे आयुष्य होते.भाजप शिवसेनेच्या सरकारने मागील पंचवार्षिक निवडणुकीत महापौर,नगराध्यक्ष आणि सरपंच पदाच्या निवडणुका लोकमतातून घेण्याचा निर्णय घेतला.
नगरपालिका,नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या त्या पाठोपाठ लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि निगडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या व्यूहरचना आखली गेली. सुस्वभावी बबूशा भांगरे या माणासाचे नाव समोर आले. लोकनियुक्त सरपंच पदा साठी सर्वसाधारण महिला आरक्षण होते. बबूशा भांगरे यांच्या सौभाग्यवती सविता भांगरे यांना लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकींच्या रिंगणात उभे करण्याचा कल गावाने दिला.
बबूशा भांगरे यांनाही त्याला अनुकूलता दाखवले, आणि पत्नीच्या प्रचारात त्यांनी स्वतःला झोकून दिले. मतदारांनी साथ दिली आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच पदाची माळ सविता ताई यांच्या गळ्यात पडली. सन्मानाचे हारतुरे गळ्यात जितके मानाचे आहे,तितकाच सरपंच पदाची काटेरी मुकुट देखील संभाळून काम करणेही महत्वाचा आहे.
बबूशा भांगरे यांनी पत्नीच्या सरपंच पदाच्या अधिकारात कुठेही हस्तक्षेप न करता,विकासावर भर दिला. गावातील सर्वच जून्या जाणत्या मंडळीनी सोबत दिली. तरूणांनी पाठबळ दिले आणि विकासाची वारे वाहू लागले. आमदार सुनिल शेळके यांच्या विश्वासू शिलेदारात बबूशा भांगरे यांचे नाव आहे. कधी काळी ओसाड गवताचे माळरान आणि दुग्ध व्यवसायाचे गाव अशी ओळख असणा-या निगडे गावची स्मार्ट व्हिलेज कडे वाटचाल सुरू आहे.
सरपंच सविता भांगरे यांना अनेक पुरस्कार आणि मानाची पदे मिळाली त्याच्या या यशात बबूशा भांगरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सविता ताई आवर्जून सांगतात.हे सगळे त्यांनी आवर्जुन सांगण्याचे कारण बबुशा भांगरे यांचा आज वाढदिवस आहे,या वाढदिवशी त्यांना आभाळभर शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या यशाचे सगळे श्रेय बबूशा भांगरे यांना देत,पुरूषही स्त्रीच्या यशात स्वतःच्या स्वप्नांची आहुती देतो हे सांगितले.

error: Content is protected !!