
वडगाव मावळ:
मानकुली हे गाव मावळ निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव आहे. वडिलोपार्जित असलेल्या वारकरी संप्रदायामुळे आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आणि त्यामुळे गणेश स्थापना आणि विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने राबविले जातात.
या वर्षी २०२१ मध्ये ५ दिवस गणपतीची स्थापना करण्यात आली.
गावातील सर्व लहान मुले आणि मोठी माणसे दररोज सकाळी आणि संध्याकाळी सर्वांच्या घरी गणपतीची आरती घ्यायचो त्यामुळे सर्वजण एकत्र येतात आणि त्यामुळे संवाद आणि विचारांची देवाणघेवाण वाढते खूप दिवसापासून एकमेकांना न भेटलेले मित्र गणपती मध्ये खूप दिवसांनी एकत्र भेटतात .
आणि खूप धम्माल करतात. ५ दिवस चालल्या गणपती मध्ये आम्ही दररोज रात्री २/३ वाजेपर्यंत भजन करायचो एक दुसऱ्यांची मजक मस्ती करून खूप छान रात्र घालवायचो तसेच ५ दिवसाच्या गणपती बरोबर ४ था दिवशी गौराईचे पण पारंपरिक पद्धतीने आगमन झाले जुनी गौराईची गाणी म्हणत सोंनपावलाने गौराईचे स्वागत केले गेले.
गौराईची स्थापना करून तिला गणपतीबाप्पाच्या बाजूला बसविण्यात आले आणि त्यानंतर त्या दोघांची जोडी खुप छान दिसत होती.शेवटच्या दिवशी जेंव्हा विसर्जन असते तेंव्हा खूप धावपळ होते .
आणि सर्वांचे गणपती भजन आणि आरती करून मंदिरामध्ये घेऊन येणे त्यानंतर मंदिरामध्ये भजन आणि आरती करून बाप्पाला विसर्जनासाठी गाडीमध्ये घेऊन जायचे.आणि शेवटी संपूर्ण गाव मिळून एकत्र येऊन शेवटच्या दिवशी गणपती आणि गौरी चे विसर्जन केले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




