
कामशेत : महालसीकरण अभियाना अंतर्गत कामशेत येथील महावीर हॉस्पिटलच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर नागरीकांना सुरक्षितपणे सर्व नियमांचे पालन करून लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा प्रारंभ ग्रामपंचायत सदस्य अंजना विकेश मुथा व शिवसेना वडगाव खडकाळा गट संघटिका मीना मुथा,माजी ग्रामपंचायत सदस्य शिल्पा दौंडे यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आले. यावेळी डॉ.विकेश मुथा, निलेश मुथा, संजय लोणकर, जितेंद्र ओव्हाळ, गणेश भोकरे, अनिल यादव आदी मान्यवर उपस्थित होते.महावीर हॉस्पिटल मधील मोफत लसीकरण केंद्रांवर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची रक्तदाब आणि तापमान तपासूनच त्यांना लस देण्यात आली.तसेच इथे लस घेणाऱ्या प्रत्येक नागरिकास महावीर हॉस्पिटल कडून प्रथम प्राथमिक उपचार मोफत देण्यात येणार आहे तसेच यापुढील उपचारासाठी लागणाऱ्या खर्चात ५० टक्के सूट देण्यात येणार असल्याचे डॉ. विकेश मुथा यांनी सांगितले तसेच अश्या स्वरूपाच्या स्वालतींचे कार्ड देखील नागरिकांना दिले.
लस घेण्यासाठी महावीर हॉस्पिटलमध्ये नागरिकांनी सकाळ पासुनच रांगा लावल्या होत्या,या रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांना महावीर हॉस्पिटल कडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.ग्रामपंचायत सदस्य अंजना मुथा: मागील दिड वर्षाच्या काळात या महामारीत आपण आपल्या जवळची माणसं गमावली आहेत,त्यामुळे आता लस मोफत मिळतेय म्हणून नाहीतर आपली जबाबदारी म्हणून आणि स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करून घ्या.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप




