डॉ.संदीप गाडेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
तळेगाव स्टेशन:
डॉ. संदीप दिगंबर गाडेकर हे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असून यांना शिक्षक दिनानिमित्त पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्काराचे वितरण डॉ.एम.जी.ताकवले माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व उपस्थित मान्यवर प्रा. हनुमंतराव भोसले, प्राथमिक उप शिक्षणाधिकारी सौ.संध्या गायकवाड मॅडम, राज्य टीडीएफ चे कार्याध्यक्ष श्री. जी.के.थोरात, श्री.शरदचंद्र धारूरकर ,श्री.के.एस. ढोमसे, प्राचार्य शिवाजीराव कामठे , सचिन दुर्गाडे, जितेंद्र देवकर,संतोष थोरात कार्यवाह पुणे शहर टीडीएफ यांच्या उपस्थित झाले. डॉ.संदीप गाडेकर हे अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे गेली १४ वर्ष अध्यापनाचे कार्य करत आहे.
त्यांनी महाविद्यालयात विविध कामांमध्ये आपली जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळत आहेत. त्यांची आत्तापर्यंत १२ पुस्तके प्रकाशित झाली असून २० शोध निबंध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.
या कार्याची दखल घेऊन त्यांना पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ यांचे वतीने हा गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार प्राप्त झालेमुळे संस्थेचे अध्यक्ष श्री.तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!