पवनानगर :
पवन जलपुजनाला धरणग्रस्तांचा विरोध आहे, पुनर्वसन करा बाधित गावांना विकास निधी द्या मगच जलपुजनाचा अट्टाहास धरा असा इशारा देण्यात आला आहे.
पवना धरणातील पाणीसाठा ९८% पेक्षा अधिक झाला असुन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मागच्या आठवड्यात जलपुजन केले.
यावरून पिंपरी चिंचवड शहर भाजपाने खासदारांवर जोरदार टीका केली. परंतु प्रत्यक्षात धरणग्रस्तानी या घटनेवर नाराजी व्यक्त करत महापौरांच्या जलपुजनाला विरोध केला आहे.
पवना धरणातून मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणामध्ये या भागातील सुमारे बावीस गावांमधील जमिनी गेलेल्या असून शासकीय आकडेवारीनुसार बाराशे तीन शेतकरी बाधित झाले आहे.
यापैकी 340 शेतकऱ्यांना जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.उर्वरित 863 खातेदार गेल्या 55 वर्षांपासून या पासून वंचित आहे.शासन दरबारी अनेक वेळा आंदोलने उपोषणे मोर्चे करून शासनाकडून पवनेचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.मागच खासदार श्रीरंग बारणे यांनी जलपूजन केल्यानंतर पिंपरी-चिंचवड भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला.
या सर्व घटनेमुळे लोकप्रतिनिधींनी जलपुजनाला येऊ नये अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली आहे.प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे या पाण्यावर महानगरपालिकेला शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे.परंतु पुनर्वसित गावच्या विकासासाठी एक रुपयाचा निधी उपलब्ध होत नसल्याने धरणग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापौरांच्या पूजनाला विरोध असून अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने जल पूजनाचा आग्रह धरू नये.प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रकात सचिव बाळासाहेब काळे,नारायण बोडके, सल्लागार रविकांत रसाळ, मुकुंदराज काऊर,राम कालेकर,सुरेश कालेकर यांनी हा इशारा दिला आहे.
▪︎पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन
▪︎ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत धरणग्रस्तांना नोकरी तसेच गाळे गाळे वाटप केले नाही
▪︎पुनर्वसन गावे दत्तक घेतलेली नाहीत इतर कोणतेही विकास योजना नाही.याचे लोकप्रतिनिधींनी आत्मचिंतन करावे.या मुख्य मागण्या त्यांनी केलेल्या आहेत.

error: Content is protected !!