पुणे:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्काराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवदारे,कृषी पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर,पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या सह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शासकीय अधिकारी उपस्थितीत होते. पूणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे विधान भवन येथे महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्कार सन-२०२०/२०२१ प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मावळ तालुक्यातील उद्योग नगरी म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतील पुणे जिल्हा मध्ये प्रथम क्रमांकचा बहुमान मिळाला. आंदर मावळातील उद्योगनगरी म्हणून ओळखली जाणा-या टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतील हा बहुमान मिळाल्याने गावक-यांनी आनंद व्यक्त केला.
सरपंच भूषण असवले, ग्रामविकास अधिकार एस.बी.बांगर,मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजीराव असवले, आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मारूती असवले,सदस्य ऋषीनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर काम करताना सर्व ग्रामपंचायत सदस्य,प्रशासकीय अधिकारी,लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याने हा पुरस्काराने मिळाले. ही प्रेरणा घेऊन अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

error: Content is protected !!