वडगाव मावळ:
दर्शन घेण्यासाठी मंदिर उघडावेत,या मागणी साठी मावळ भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने शंखनाद व घंटानाद अंदोलन छेडले.
वडगांव मावळ येथील श्री पोटोबा मंदिर ते मावळ तहसील कार्यालय पर्यंत भजन करत मावळ भाजपा अध्यात्मिक आघाडीने पायी दिंडी काढली.
मंदिर उघडी करण्यासाठी शंखनाद व घंटानाद आंदोलन करून भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर उघडी करावीत या आशयाचे निवेदन तहसीलदार मधुसूदन बर्गे नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांना देण्यात आले.
यावेळी मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे,,मावळ भाजपा अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष ह.भ.प.सुनील महाराज वरघडे, माजी उपसभापती शांताराम कदम, तालुका प्रसिद्धीप्रमुख अनंता कुडे,युवा नेते देवाभाऊ गायकवाड,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे,अखिल भारतीय मंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष ह भ प सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे ,संतोष कुंभार, बाबाजी काटकर,शांताराम बोडके,लक्ष्मण ठाकर, राजू असवले,यांच्यासह तालुक्यातील,वारकरी मंडळी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!