सोमाटणे:
काळया आईची सेवा करीत वावरात राबायचा. कावडीने दूध वाहयचे. दहीदुधाने भरलेल्या घागरच्या उतरंडी हे त्यांचे वैभव. गोकुळ सारख्या भरलेल्या घराला समाजत मान सन्मान मिळवून दिला तो कुस्तीने लाल मातीत कुस्त्यांचा फड रंगवायचा आणि मिळालेली ढाल,गदा मोठया अभिमानाने घरात वाजत गाजत घेऊन जायचे. अनेक कुस्त्या चितपट करून मिळालेल्या पदकामुळे त्याचे घर भरून गेले.
हाच वारसा आणि वसा जपण्यासाठी रोज जोर,बैठका,सरपटया,धावणे,पोहणे आणि सराव करीत लढणारा आदेश वाळुंज. त्याच्या मेहनतीला परमेश्वराने यश द्यावे ही मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना. आदेशचे आजोबा चिंधू वाळुंज,शिवणेतील प्रगतशील शेतकरी. भावा बहिणीच्या गराड्यात वाढलेले चिंधू वाळुंज गावात आणि घरात “दादा “या बिरुदावलीने लोकप्रिय. दादाच्या शब्दाला मोठा मान.
त्यांचा शब्द लोक प्रमाण मानून राबणा-या वाळुंज कुटूंबानी शेतीत प्रगती केली ,शेतीला दूध धंद्याची जोड दिली आणि बघता बघता वाळुंजच्या घराचे घरपण वाढत गेले,बारदान्याचे घर,मोठया खटल्याचे अन मोठ घर असा नावलौकिक झाला. या नाव लौकिकाला साधलं शोभेल यासाठी चिंधू दादा आणि भावांनी पैलवान जोपासली. पैलवान की तून अनेक मित्र,सखे,सवंगडी या सर्व भावांनी मिळवले. लाल मातीच्या आखाड्यात रेवडीवर सुरू झालेल्या कुस्तीची मैदाने मारून वाळुंज परिवारातील सर्व पैलवान मंडळीनी मानाची पदके घरी आणले.
गावाचे आणि कुटूबांचे नाव लाल मातीच्या आखाडयात आपल्या घामाने कोरले. एकीकडे लाल मातीत कुस्तीचा फड जिंकायचा आणि दुसरीकडे शेतात राबून घामाच्या धारानी शिवार फुलवायचे असा नित्यक्रम असलेल्या वाळुंज परिवारातील आदेश पैलवानकीत करिअर करतोय. यासाठी त्याची प्रेरणा ,प्रोत्साहन आणि आयडाॅल त्याचे आजोबा,वडील,चुलते, त्याचे वस्ताद आणि घरातील सगळ्या माता माऊल्या.
प्रथम मावळ केसरी पैलवान खंडू वाळुंज त्याचे चुलते त्याच्या मार्गदर्शनाखाली वस्ताद शंकर भाऊ कंधारे यांच्या गुरुकुल संकुलात आदेश कुस्तीचे धडे गिरवतोय. भल्या पहाटे सुरू होणारा त्याचा दिनक्रम धावणे, कसरत आणि व्यायामाने सुरू होतो. डाव प्रतिडावाचे धडे गिरवताना तो देहभान विसरून राबतोय. उत्तम मल्ल होण्यासाठी अपेक्षित असणारी सर्व मानसिक व शारीरिक क्षमता असलेला आदेश चांगला मल्ल होऊन वाळुंज कुटूबियांच्या नावात मानाचा शिरपेच रोवले असा विश्वास समस्त वाळुंज परिवार आणि आप्तेष्ट मंडळीना आहे. दूध व्यवसायावर हुकमत गाजवणा-या वाळुंज परिवारने ‘माऊली टी ‘ हा ही व्यवसायाचा बॅण्ड केला आहे.
आदेवचे वडील स्व. शिवाजीराव चिंधू वाळुंज यांचेही पैलवान की क्षेत्रात मोठे नाव होते. त्यांनीही पैलवानकी गाजवली. लाल मातीच्या आखाड्यात अनेक मैदाने गाजवली. आज आदेश लालमाती सह मॅटवरील सराव करतोय. आदेशची आई श्रीमती राधिका शिवाजीराव वाळुंज शिवणे ग्रामपंचायतीची सरपंच होती. खटल्याच्या कुटूंबातील तीही लाडकी सून आज कर्तबगार आईची भूमिका बजावत आहे.हा सगळा लेखनप्रपंच मांडायचे कारण,आमचा लाडका भाचा आदेश याचा वाढदिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देत,नव्या उमेदी सह त्याचे आयुष्य कुस्तीच्या मैदानावर अधिक समृद्ध होवो याच आदेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(शब्दांकन- सोमनाथ भोसले,वडगाव मावळ)

error: Content is protected !!