वडगाव मावळ:
स्वरानंद विश्वसंगीत विद्यालयाच्या पुढाकाराने विठू माऊली प्रतिष्ठान आयोजित गुरुपोर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.गणेश पूजन, सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन, विद्यार्थ्यांचे सादरीकरण,
मान्यवर कलाकरांचे सादरीकरण, गुरुपूजन, सत्कार समारंभ, आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. स्वरानंद विश्व संगीत विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण, कोकण रत्न तालमणी पुरस्कृत ,मृदंगाचार्य ह.भ. प बंडाराज घाडगे महाराज यांच्या संकल्पनेतून ,कर्तृत्वातून ,कलेतून आज शेकडो तरुण मुले सांप्रदायिक वाद्य पखवाज ,तबला वाजविण्यात परांगत झालेली आहेत.
बंडाराज घाडगे महाराज यांच्या सहवासात राहिल्यामुळे युवा पिढीला देखील सांप्रदायाची आवड निर्माण झाली आहे .कित्येक मुले मुली या सांप्रदायात पांडुरंगाची सेवा करत करत आपले करिअर देखील करत आहेत .
घाडगे महाराज्यांच्या बोटांमध्ये इतकी जादू आहे की किर्तनसोहळ्या मध्ये वारकरी त्यांनी दिलेल्या पखवाजाच्या तालावर बेधुंद होऊन नाचत असतात . घाडगे महाराज यांना मोलाची साथ त्यांच्या सौभाग्यवती आरती यांची साथ लाभली आहे
गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाला प्रकाश सुर्वे (आमदार मागाठाणे),श्री.किशोर काकडे साहेब (काक इकोनॉमिक कुटुंबप्रमुख),रवि मुंडे (महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा) संध्या विपुल दोशी (नगरसेविका),राजन‌ निकम (उपविभाग प्रमुख), हरिओम घाडगे (अभिनेते),राजेश पार्टे (महाराष्ट्र का.से.सचिव),प्रणय दरेकर(संगीतकार व वादक),अरविंद साळुंखे उपस्थित होते.
सूत्रसंचालन रामदास शिंदे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील करिष्मा रामदास शिंदे ,हर्षद कावडे , मावळ तालुक्यातील अभिषेक रामदास यादव हे महाराजांकडे पखवाज वादन शिकत आहे.तसेच सर्व वारकरी संप्रदायातील मंडळीं कार्यक्रमाला उपस्थित होते.

error: Content is protected !!