पवनानगर : बेडसे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतशील शेतकरी ह भ.प.पांडुरंग दामु दहिभाते यांचे सर्पदंशाने निधन झाले. सकाळी सातच्या सुमारास जनावरांना चारा कापण्यासाठी गेले होते. गवताची पेंडी कापताना त्यांना सर्पदंश झाला.त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतू सर्पाचा जबरी चावा असल्याने दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले,भाऊ, सुना,नातवंडे असा परिवार परिवार आहे. माजी उपसरपंच नाथा दहिभाते यांचे ते भाऊ तर बजरंग दल मावळ तालुका गोरक्षा प्रमुख सुधिर दहिभाते यांचे ते वडील होत.माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते यांचे चुलते होते.

error: Content is protected !!