वडगाव मावळ:
हैदराबाद ते मुंबई असा पायी प्रवास करीत एक तरूण अवलिया उद्योगपती रतन‌ टाटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मजल दरमजल करीत चालत प्रवास करतोय.
व्यंकटेश विकराबाद असे या तरूणाचे नाव आहे तो प्रत्येक दिवशी ४९ किमी अंतर पार करतोय आतापर्यंत सुमारे सातशे किमी अंतर त्याने पार केले. या तरुणाकडून उद्योजक टाटा यांना शुभेच्छा दिल्या जाणार आहे.
मावळ तालुक्यातील अनसुटे या खेड्यातील वाहन चालक सोमनाथ मोधळे यांच्याशी या तरुणाची कान्हे फाटा येथे भेट झाली. व्यवसायाने चालक असलेल्या मोधळे यांच्या नजरेतून पायी जाणारा हा तरूण सुटला नाही. त्यांनी या तरूणाचे स्वागत करून त्याच्या जेवणाची सोय केली व पुढील कार्यास शुभेच्छा देत निरोप दिला.

error: Content is protected !!