वडगाव मावळ:
निवडणुकांचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. राजकीय आराखडे बांधले जात आहे.कार्यकर्ता गृहित धरून त्याला आघाडीवर पुढे राहून खिंड लढवावी लागते. कार्यकर्त्याची वैचारिक बैठक त्याला वारसा हक्काने आपसूक मिळते असे म्हणा किंवा येते असे ही म्हणा.
मामा आणि चुलता मनसेत सक्रीय असल्याने या विचाराचा पगडा त्याच्या मनावर विद्यार्थी दशेत पडला आणि हा मनसे सैनिक गावपातळीवर काम करू लागला. गावातून सुरू केलेले त्याचे काम उजवे ठरू लागले.त्याच्या निष्ठेची तळमळ त्याला स्वस्थ बसून देत नाही.खेड्यातील या उमद्या तरूणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संघटनेच्या जोरावर महाराष्ट्र भर मित्र जमावले.
भरत घाग असे या तरुण कार्यकर्त्यांचे नाव.
आंदर मावळातील मानकुली अनसुटेचा हा तरुण कार्यकर्ता. त्याला मनसेची आवड लहानपणापासूनच. राजसाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी तो नेहमीच उत्सुकता असायची .मनसे‌ म्हटलं तरी अंगात वेगळीच शक्ती यायची .
विद्यार्थी दशेत तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमाला जायचा.तेव्हापासून मनसेचे विचार मनात रूजले . मामा संतोष शंकर‌ मोधळे मावळ तालुका उपाध्यक्ष मनसे व चुलते तुकाराम घाग आंदर मावळ उपविभाग अध्यक्ष हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करत होते त्यांच्या पाठी मागे खंबीर उभे राहण्यासाठी त्याने ग्रास रूटला काम सुरू केले.
मनसेचे कार्यकर्ते कमी पण एकदम कट्टर ही शिकवण त्याने आत्मसात केली. कोणताही कार्यक्रम असला तरी स्वखर्चाने पार पाडायचा यासाठी पदरमोड करायची हे ठरवलेले. त्यात तोही आघाडीवर राहून सहभाग द्यायचाच.
आंदर मावळ मध्ये आमची मनसे टिम मावळामध्ये चांगले कार्यक्रम आयोजित करते‌.आणि मामा आणि चूलता नेहमीच येथील स्थानिक प्रश्नी आग्रही असतात, या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करीत असतात. रस्त्यातील खड्डे, महावितरणची समस्या, एसटी महामंडळाच्या समस्या, आरोग्य, शिक्षण, पाणी या प्रश्नी मनसे नेहमीच आक्रमक राहिली.
यासाठी निवेदन द्यायची आणि ती काम पूर्ण व्हायचीच आणि त्यामुळेच या दोन माणसांची कामाची पद्धत पाहून तोही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रीय झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटलं तर मराठी माणसाचा आधार आहे राजसाहेब नेहमीच मराठी माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याची त्याची भावना आहे.
राजसाहेबांचे विचार मनाशी बाळगून तो मनसेत काम करत आहे.आज महाराष्ट्र सैनिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर बरेच मित्र जोडले गेले .हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी देणगी असल्याचे तो मानतो.
मराठी अस्मिता जपणारे राजसाहेब त्यांच्या मुळेच आज सर्व सण रूढी परंपरे प्रमाणे साजरे होताना दिसतात . महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा देते यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आवड निर्माण झाली असे निष्ठावंत कार्यकर्ते फक्त मनसेत नाही. सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनेत निष्ठावंत कार्यकर्त्याची ताज्या दमाची फौज आहे. ती आता कामाला लागेल ऐवढे निश्चित.फक्त निष्ठावंताना संधी मिळावी इतकी अपेक्षा ठेवणे यात गैर काय आहे.

error: Content is protected !!