वडगाव मावळ:
खराब मोबाईल ..नेटवर्क नाही…बॅटरी बाकीची क्षमता कमी…रिचार्ज साठी निधी वेळेत नाही…लाईट नसल्याने किंवा रेंज नसेल तर केलेलं काम दिसत नाही…म्हणून लगेच मानधनात कपात करण्यात येते…अशा अनेक अडचणीला त्रासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सरकारला मोबाईल परत करण्याचे मोबाईल वापसी अंदोलन केले.
या अंदोलनात अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविकेंचा dress code असलेल्या लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. मोबाईल नको आम्ही पुर्वी सारखं रजिस्टर द्या असा नारा या सेविकांनी लावला.पोषण ट्रॅकर ऍप मध्ये माहिती भरण्यात येणाऱ्या अडचणी येतात या विरोधात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बुधवारी मोबाईल वापसी आंदोलन झाले.
अंगणवाडी सेविकांना मोबाईल मधील पोषण ट्रॅकर ॲप मध्ये दैनंदिन माहिती भरावी लागते. दैनंदिन माहिती न भरल्यास त्यांना मानधन दिले जात नाही. दुर्गम भागात नेटवर्क मिळत नाही. अनेकदा वीज नसते. अशा परिस्थितीत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये माहिती भरता येत नाही.
तसेच त्यांना २०१९ मध्ये दिलेले मोबाईल आता आऊट डेटेड व नादुरुस्त झाले आहेत. मोबाईल हरवला तर बारा हजार रुपये भरावे लागतात. दुरुस्ती स्वतः करावी लागते. कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद होत नाही. त्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना गरोदर माता तपासणी, पोषण आहार तपासणी, कुटुंब सर्व्हेक्षण, नवीन कुटुंब व स्थलांतर कुटुंब माहिती, नवीन जन्म व मृत्यु नोंद, शाळाबाह्य मुले व मुलींसाठी उपक्रम, शून्य ते सहा वर्ष वयांच्या मुलांना ताजा गरम आहार, रेशन पोचविणे आदी विविध कामे करावी लागतात. त्यामानाने मानधन मात्र अत्यल्प मिळते.
पोषण ट्रॅकर ॲपने त्यांच्या ताणतणावामध्ये आणखी वाढ झाली आहे. या ऍपवर माहिती भरण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. शासनाने दिलेला मोबाईल परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली. शासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!