तळेगाव दाभाडे:
गाव पातळीवर काम करणा-या आम्ही.आमच्या व्यक्तिमत्व विकासावर पैलू पाडावे म्हणून मेधावीण फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे यांनी कार्यशाळा घेतली आणि आमची त्यांच्याशी मैत्री जुळली.
वैशालीताई आमच्या सगळ्यात मानाने आणि वयाने मोठ्या. पण आम्हा प्रशिक्षणार्थीना त्यांनी मोठी आदराची वागणूक दिली. त्यांच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो.त्यांच्या एका वाक्याने , एका एका शब्दाने आम्हाला बळ मिळाले आणि उर्जाही.कार्यशाळेच्या त्या दहा दिवसांत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आणि खूपशी प्रेरणा ही मिळाली.
मेधावीण फाऊंडेशनच्या या व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या दहा दिवसांच्या कालावधीत शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील स्त्रियांची गरज ओळखून त्यांना मदत करण्यासाठी वैशालीताई स्वतः प्रयत्नशील राहिल्या.
सावित्रीबाई फुले प्रमाणे माझ्या माता भगिनींनी काम करून स्वत:च्या प्रतिमेची छाप तर उमटवली पाहिजे याशिवाय आपण करीत असलेल्या कामातील प्रामाणिकपणाने त्या पदाची उंची वाढवून सर्वसामान्यांना त्याचा अधिक लाभ झाला पाहिजे असा त्याचा आग्रह मनाला खूपच भावला.
मनमिळाऊ स्वभाव,दिलदार व्यक्तिमत्व अशा वैशाली ताई म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा नकळत मनावर ठसा उमटवला आणि आपसूक ओठावर
दिव्यत्वचि जिथे, प्रचिती तिथे कर माझे जुळती असे सुभाषित आले. आज वैशालीताई यांचा वाढदिवस या वाढदिवशी त्यांना आभाळभर शुभेच्छा.
(शब्दांकन- साधना वाडेकर,पोलीस पाटील)

error: Content is protected !!