वडगाव मावळ:
पर्यटन संचलनालय, पंचायत समिती मावळ, कृषी विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील शेतकरी बांधव व युवकांसाठी सोमवार दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजता रायकर फार्म, गोवित्री, ता. मावळ येथे होणारे प्रशिक्षण शिबीर पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
पंचायत समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्वांना कळविण्यात येते की काही अपरिहार्य कारणामुळे उद्या दिनांक 23 ऑगस्ट 2021 होणारे कृषी पर्यटनाचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले आहे पुढील तारीख व ठिकाण आपणास वैयक्तिक फोन व मेसेज द्वारे कळविण्यात येईल.

error: Content is protected !!