
पवनानगर:
प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे व हीलींग हँड्स फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर येळसे येथे तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
डॉ व्ही पी गेंगजे,डॉ राजेंद्र मोहिते ,मेडिकल ऑफिसर ,सर्व आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर हिलींग हँडस फाउंडेशन कडून डॉ पार्थ शर्मा यांनी पेशंट तपासणी केली तेजश्री खलाटे यांनी मेडिसिन दिले आणि मार्गदर्शन केले,सुमित तुपदार,रोहित रगडे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले
शिबीर सकाळी ११ ते २ या दरम्यान घेण्यात आले, सदर शिबिरात 35 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले. सौ.अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक)यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले, व सदर शिबिरास सौ.मधुरा भाटे (संस्था समन्वयक) यांचे मार्गदर्शन लाभले.



