टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील दुर्गम भागाला शहराशी जोडणारा वडेश्वर रस्तावर खड्डे पडलेत. या ठिकाणावरून जवळपास वीस ते बावीस गावातील नागरिक प्रवास करत असतात. या अंतर्गत येणारा टाकवे ते वडेश्वर या भागातील रस्ता खूप मोठया प्रमाणात खड्डेमय झाला आहे.
वेळ आल्यावरती माणूस व एक पाऊस पडल्यानंतर रस्त्याचा दर्जा कळतो अशीच परिस्थिती या ठिकाणी मावळ मधील काही भागांमध्ये मुख्य रस्त्याची झालेली आहे,
टाकवे ते वडेश्वर या ठिकाणी अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे . या ठिकाणी वाहन चालकाला तारेवरची कसरत करून गाडी चालवावी लागत आहे, यामध्ये लहान मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झालेले आहेत.
या भागामधील मोठाले धबधबे सह्याद्रीच्या पर्वतरांगा पाहण्यासाठी शनिवार-रविवारीचा पर्यटकांचा खूप मोठ्या प्रमाणात लोंडा येताना दिसून येत आहे . पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता डांबरीकरण करून रुंद करणे, रोडच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या व्यवस्थित होणे खूप महत्त्वाचे आहे.
वारंवार लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांना स्थानिकांनी सूचना करून सुद्धा या ठिकाणी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचे काम प्रलंबित आहे.
या कामास सुरुवात करावी अशी मागणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप मालपोटे, चंद्रकात असवले,सल्लागार अनिल जाधव , सल्लागार पत्रकार संकेत जगताप, तानाजी मोरे, निलेश जगताप, किरण भांगरे, राघुजी मोरमारे, गणेश गुरव, ज्ञानेश्वर ढोरे तसेच फळणे गावातील सामाजिक कार्यकर्ते जालिंदर मालपोटे, विठ्ठल मालपोटे, सुनील पऱ्हाड, शिवाजी ओव्हाळ, यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळ यांच्याकडे निवेदन देणार आहेत.

error: Content is protected !!