लोणावळा :
भारतीय जनता पक्ष ही एक विचारधारा असून बुथ अभियानातून एक उत्तम कार्यकर्ता तयार घडतो,असे मत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कुसगाव येथे व्यक्त केले.समर्थ बूथ अभियानाअंतर्गत ओळकाईवाडी कुसगाव येथे समर्थ बूथ अभियानाची बैठक ओळकाईदेवी मंदिरात पार पडली यावेळी बाळा भेगडे बोलत होते .
लोकसभा मावळ प्रभारी प्रशांत ढोरे, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, भाजपाचे कार्याध्यक्ष अर्जुन पाठारे, तारासिंग बोहोरा ,राजू शिंदे, विलास ढोरे ,विनोद विश्वकर्मा निलेश जाधव , ओळकाईवाडी कुसगाव मधील सर्व भाजप कार्यकारणी प्रभागातील ज्येष्ठ पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळा भेगडे म्हणाले,”पार्टी मजबूत होण्यासाठी पार्टीकडे एक उत्तम संघटक व पक्षाची भूमिका, विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवणारे कार्येकर्ते निर्माण झाले पाहीजे. त्यासाठी बुथ अभियान गरजचे आहे.
झालेल्या बैठकीत बूथ समिती रचना पुनर्गठन करण्यासाठी बूथ अध्यक्ष निवडण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जून पाठारे यांनी केले . सुत्रसंचालन तारांसिंग बोहरा यांनी केले .

error: Content is protected !!