टाकवे बुद्रुक: टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या
चेअरमनपदी श्री.महादू टल्लूजी गुनाट , प्रसिद्ध गाडामालक यांची बिनविरोध निवड झाली.टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मारुती तुकाराम असवले यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी ही निवडणूक घेण्यात आली. श्री.महादू टल्लूजी गुनाट यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सोसायटीची निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली. तसेच मागील पंचवार्षिक मध्ये 2011 /12 मध्ये त्यांनी सोसायटीचे चेअरमन पद भूषवले होते. आत्ताच्या बिनविरोध निवडीमुळे दुसऱ्यांदा त्यांना चेअरमन पदाचा मान मिळालेला आहे.
बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मावळ तालुका देखरेख संघ माजी चेअरमन संभाजी टेमगिरे, सोसायटीचे माजी चेअरमन मारुती असवले,माजी चेअरमन दत्तात्रय घोजगे,माजी चेअरमन अनंता असवले, माजी चेअरमन विकास बंडा असवले, चंद्रकांत वाघमारे, गणेश मोरे, अनुसयाबाई गायकवाड, दत्तात्रय मालपोटे. सचिव मदन अडिवळे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

error: Content is protected !!