वडगाव मावळ :
ग्रामपंचायतीचा बनावट शिक्का बनवून या शिक्क्याच्या आधारे ८ अ चा बनावट उतारा तयार करून त्यावर ग्रामसेवकाची खोटी सही करणे एकाला महागात पडले आहे.हे प्रकरण त्याच्या अंगलट आले असून त्याला
अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी कुसवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रत्नाकर रतनपारखे यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच झाले असे आंदर मावळातील कुसवली गावातील भाऊ लक्ष्मण गवारी यांनी ६ जुलै पूर्वी कुसवली ग्रामपंचायतीच्या नावाचा खोटा रबरी शिक्का तयार केला.
याच गावातील लहू पांडुरंग चिमटे याला ८ अ चा बनावट उतारा तयार करून त्यावर ग्रामसेवकाची खोटी सही केली आणि दाखला दिला, ही तक्रार ग्रामसेवक रतनपारखे यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दिली ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून वडगाव मावळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यात भाऊ गवारी यास ताब्यात घेऊन वडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे हे करत आहेत.

error: Content is protected !!