करंजगाव:
करंजगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दिपाली माणिक साबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खंडू कुढले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.ग्लोडन ग्लेडस माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव विजय टाकवे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यदिन निमित्त सरपंच दिपाली साबळे,अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या मावळ तालुका सरचिटणीस पदी उपसरपंच नवनाथ ठाकर यांची,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी भाऊसाहेब मोरमारे यांची निवड झाल्याबद्दल, नव्या रूजू झालेल्या अंगणवाडी सेविका साधना उंडे, मंगल भरत गोडे,केंद्रप्रमुख घोडके सर, भाजपाच्या बूथ अध्यक्षपदी अमोल शेलार यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आले.
सरपंच दिपाली साबळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ स्वखर्चातुन इमारत बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादू शेडगे, वैशाली कुटे, उज्ज्वला पोटफोडे,ममता गवारी,,कौशल्या पवार,श्रीरंग गोडे, भगत,तंटामुक्त अध्यक्ष इंदाराम उंडे, माजी सरपंच तानाजी पोटफोडे, रविंद्र शेलार पोलीस पाटील ब्राम्हणवाडीचे राजश्री तंबोरे,करंजगाव चे पोलीस पाटील विठ्ठल तंबोरे,मोयमारेवाडीचे पोलीस पाटील लहू पोफळे, उमेश तंबोरे,मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम,गामसेविका मंगल सुरवाडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी,आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!