*मोफत प्रशिक्षणाची सुवर्ण संधी
माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल व बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल येथे. शनिवार दि.१४ ऑगस्ट २०२१रोजी सकाळी १० वाजता.
निर्माण – टेक महिंद्रा फाऊंडेशन स्मार्ट व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, यांचेमार्फत १८ ते ३५ वयोगटातील तसेच १०/१२ वी झालेल्या होतकरू आणि गरजू मुली / महिलांना नोकरी मिळावी व त्या स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीकोनातून विशेष प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये English, IT ( Word, Power Point, Excel, Adv. Excel ) तसेच WPR (Work Place Readiness) यांची सत्रे घेतली जातात. तसेच वेळोवेळी विविध विषयांवरील मार्गदर्शन सत्रेही घेतली जातात. प्रशिक्षणाचा कालावधी जवळपास चार महिन्यांचा असतो ज्यामध्ये प्रत्यक्ष training तीन महिने आणि १५ दिवस / १ महिना on job training किंवा interview प्रक्रिया असते.
या प्रशिक्षणानंतर मुलींना / महिलांना नोकरी मिळवून देण्यासाठी संस्थेतर्फे संपूर्ण साहाय्य केलं जातं. प्रशिक्षणासाठी तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. प्रशिक्षणानंतर कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळते. त्याचाही नोकरीसाठी उपयोग होतो.
प्रशिक्षणासाठी आधारकार्ड तसेच मार्कशीटची xerox व पासपोर्ट साईझ फोटोची आवश्यकता असते. तसेच नियमित उपस्थिती तसेच प्रशिक्षणानंतर नोकरी करणे आवश्यक असते. जर कोणी विद्यार्थिनी प्रवेश घेण्यास (ऍडमिशनसाठी) इच्छुक असल्यास *संकल्प-सिंधु चरीटेबल ट्रस्ट*
याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याला देण्यासाठी शनिवार, दि.१४-०८-२०२१ रोजी सकाळी १०.३० पर्यंत आपल्या ठिकाणी येत आहे. कृपया जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहून यांचा लाभ घ्यावा. अधिकाधिक महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे.
आपले…
*संकल्प-सिंधु सोशल वेल्फेअर फौंडेशन*
सौ. माधुरी चव्हाण-९४२३०४१३७५
पुणे

error: Content is protected !!