पवनानगर:
माजगाव सोसायटीचे चेअरमन श्री पांडुरंग जांभुळकर यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांची नियुक्ती केली. महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी प्रभारी श्रीकांत भारती, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे , तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव,नगरसेवक देविदास कडू, सरपंच वसंत म्हस्कर ,तालुका उपाध्यक्ष शत्रगुण ठोंबरे, तालुका सरचिटणीस गणेश ठाकर, आरपीआय तालुका सरचिटणीस दादू वाघमारे ,सचिन ठोंबरे, शंकर महाराज पोळ, एकनाथ महाराज जांभुळकर, राजू जांभुळकर, माजी सरपंच सुनील ठोंबरे ,संभाजी ठोंबरे ,वसंत मोहोळ उपस्थितीत होते.
पांडुरंग जांभूळकर निवडीनंतर म्हणाले की, ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे

error: Content is protected !!