वडगाव मावळ:
किवळे येथील तेजस्विनी आदिवासी स्वयंम सहाय्यता बचत गटातील महिलांनी ‘राखी’ विक्रीसाठी सुरुवात केली.त्यांच्या व्यवसाय वाढवण्यास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया या संस्थेने त्यांना स्किल ट्रेनिंग देऊन मदत केली आहे.
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थे अंतर्गत स्किल ट्रेनिंग देऊन संस्थेच्या बचत गटा अंतर्गत तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री या उपक्रमांतर्गत तनिष्का हॉलमध्ये राखी चे स्टॉल लावण्यात आले .
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेचे श्री.मोहसीन शेख सर (प्रोजेक्ट मॅनेजर SD-TC)यांनी सांगितले की ,”या उपक्रमाने आपल्या भागातील महिलांना सिजनेबल व्यवसाय करून करून आर्थिक फायदा मिळू शकतो. बचत गटांनी तयार केलेल्या महिलांची राखी विकत घेऊन आपण एक सामाजिक उपक्रम राबविला जाऊ शकतो आणि महिलांना त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी देखील मदत करू शकतो.
आज आपल्या भागातील महिलांची राखी जर आपण घेतली तर एक नवीन संकल्पना अंतर्गत महिला सक्षमीकरण होईल त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना आर्थिक फायदा होईल. जवळच्या सर्व गावातील महिलांनी आपल्या या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी महिलांकडून राखी खरेदी करावी अशा पद्धतीने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला तेजस्विनी आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला उपस्थीत होते.आणि हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेचे श्री.मोसिन सर ,सारिका शिंदे, सविता मदगे, पंढरीनाथ बालगुडे हे उपस्थित होते.

error: Content is protected !!