टाकवे बुद्रुक:
त्यांच्या कर्तृत्वाचा आदर, मानसन्मान आणि दरारा पंचक्रोशीत दांडगाच. लेकी सुनांना तिच्या प्रती मोठा स्वाभिमान. आमची आई आहे ना. हा लेकीचा आणि आमची आत्या आमची आईच हा सुनांचा आदराचा शब्द त्यांच्या मायेच्या ओलाव्याची जाणीव करून देतो.
माहेरी आणि सासरी श्रीमंती असली तरी या माऊलीने जमिनीशी घट्ट नाळ जोडली.
रानभाज्याचा मेवा आणि आयुष्यभर स्वच्छतेचा धडा या मातेने गिरवला आणि जपला. सोपे नव्हते गोपाळराव जयतू जगताप या भल्या मोठया आसामीची पडछाया बनून आयुष्यातील चढ उताराला सामोरे जावून आपल्या कर्तृत्वाची छबी पुढील पिढ्यांनी ती तशीच जतन करून ठेवायची.सावित्रीबाई गोपाळराव जगताप असे या आदर्श मातेचे नाव.
वडेश्वर हे तिचे माहेर नारायणराव लष्करी यांची ही लेक.
वडेश्वरचे माजी सरपंच,पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक नथुराम नारायण लष्करी त्यांचे भाऊ. मोठ्या लाडात वाढलेल्या सावित्रीबाई तितक्याच तोलामोलाच्या सधन परिवाराच्या गृहलक्ष्मी झाल्या. माऊचे कारभारी जुन्या पिढीतील पोलीस पाटील.जे पंचक्रोशीतील न्यायनिवाडा करायचे त्या जयतू जगताप पाटील यांच्या सूनबाई झाल्या. वडिलांच्या राजकारण व समाजकारणाचे बाळकडू अंगी असलेले गोपाळराव जयतू जगताप याच्या सुविद्य पत्नी असलेल्या सावित्रीबाई प्रचंड स्वच्छता प्रिय.
भौगोलिक दृष्ट्या अंत्यत दुर्गम भागातील माऊ पंचक्रोशीत या बडया घरच्या सूनबाई माहेरीची आणि सासरच्या श्रीमंतीचा बडेजाव कधी मिरवला नाही.
शेती ,गाई वासरे,गुरे हीच त्यांची संपत्ती.शेतीला त्यांनी कष्टाने फुलवली.
पती जनस॔घाचे निष्ठावंत, पंचवीस गावातील एकमेव जनसंघाचे निष्ठावान. कै.गोपाळराव जयतू जगताप पाटील तालुक्यातील बडी आसामी. गावचे कारभारी. गावाने सरपंच म्हणून त्याना संधी दिली. आणि सावित्रीबाई मावशीची जबाबदारी वाढली पण ही जबाबदारी त्यांनी अगदी सहज पेललेली.
माहेरी लाडका भाऊही गावचा कारभारी. फरक एवढाच पती जनसंघाच्या रथावर बसून घौडदौड करीत होते. तर भाऊ काँग्रेसचा हात हातात घेऊन पुढे चालेले होते. भाऊ पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक होते.
राजकीय दृष्ट्या या दोन्हीही परिवाराच्या भूमिका परस्पर विरोधी असल्या. तरी नात्यात कधीच कटू पणा आला नाही.
ही माऊली आपल्या वाट्याला आलेले काम निष्ठापूर्वक करीत होती.आमची सासू खूप प्रेमळ,सुस्वभावी आणि
गरीब.ती कधीही वरच्या आवाजात बोलली नाही. सा-या परिवारात, नात्या गोत्यात आणि गावात बजाआई म्हणून त्या परिचितही होत्या आणि लोकप्रिय ही. स्वच्छतेबाबत त्या सतत जागृत असायच्या. नीटनेटकेपणा टापटीपपणा हा त्यांचा आवडता विषय. एकनाथ गोपाळराव जगताप, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मच्छिंद्र गोपाळराव जगताप ही त्यांची मुले. आणि
चंद्रभागा प्रकाश शिंदे राजपुरी,लीलाबाई बनाजी शिंदे माऊ,भानूबाई पोपटराव लष्करी या लेकी.
सावित्रीबाईनी आयुष्यात सुख आणि दु:ख दोन्हीही पाहिले. सुखाच्या हिंदोळ्यावर त्या अलगद डुलल्या. दु:खात त्या तितक्याच डुंबल्या.
पतीच्या जाण्याचे दु:ख मनात दाबून ही माऊली लेकरांसाठी उठली. जिद्दीने लढली. लेकरांनी तिचे पांग फेटले. ८७ व्या वर्षी या मातेने इहलोकीची यात्रा संपवली.तो पर्यत लेकांनी, लेकींनी, सुना, नातवंडे, नातसूनांनी या माऊलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले.
पतीच्या दु: खाला पाठीवर टाकून ही माऊली झुंजली. पण संतोष एकनाथ जगताप हा तरूण नातू गेल्यावर मातेने कधीच पुरणपोळी खाल्ली नाही. तिने कधीच सणावाराला पुरण पोळीचा घास हाताने मोडला नाही. समाजातील चालत्या बोलत्या आई नावाच्या विद्यापीठाला भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Content is protected !!