कामशेत:
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाथरगावजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीला ठोकले. यात
तिघे जण जखमी झाले , आणि कार चालक पळून गेला. पती,पत्नी आणि मुलाला ठोकून कार चालक पळाला. पण रक्ताने माखलेल्या या कुटूंबाला तेथून दुचाकीवरून जाणा-या शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या निलेश लाड या सदस्याने पाहिले आणि तातडीने मदतीला धावून आले. महामार्गावर अनेक अपघात होतात,त्याकडे कानाडोळा करून अनेक जण निघून जातात. पण निलेश सारखे विरळच जे तातडीने मदतीला धावून येतात.
चार दिवसापूर्वी येथे झालेल्या अपघातात दीपक शंकर ढगे (वय ४५), विश्रांती दीपक ढगे (वय ३७), मोरेश्वर दीपक ढगे(वय ९, रा. भाजे) हे जखमी झाले. त्यांना तातडीने मदत मिळाल्याने त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
निलेश लाडने वेळ काळ परिश्रम याचीच कोणतीच पर्वा न करता तातडीने केलेल्या या कर्तव्यदक्षते बाबत महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांच्या हस्ते निलेश लाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब गायकवाड अनिल टाक,प्रतिक्षा पवार
ममता देवडा, विदेश देसाई,प्रज्ञा तराळ उपस्थित होते.
डाॅ विकेश मुथा म्हणले,” अपघातात तत्परतेने मदतीला धावून आलेल्या या तरूणाचे खूप अभिनंदन. रस्त्यावर अपघात झाले की निघून जाणारे अनेक जण पहिले. मदतीला धावून आलेला निलेश हा पहिलाच.

error: Content is protected !!