पवनानगर : विश्व हिंदु परिषद बजरंग दल मावळच्या वतिने मावळ तालुक्यातील विविध वाड्या वस्त्यांवरील आदिवासी बांधवांना १२०० अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहेत त्याचं पार्श्वभूमीवर रविवार (दि.८) रोजी पवन मावळातील चावसर येथील कौटुंबवाडी येथे गरीब व गरजू बांधवांना अन्न धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. 
मावळ तालुक्यातील डोंगराळ भागात अनेक कातकरी वस्त्या आहेत. या कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेला. उद्योग धंदे बंद पडले. परंतु ज्या बांधवांचे हातावर पोट आहे, अश्या कातकरी बांधवांवर उपास मारीची वेळ आली.
काबाड कष्ट करुन जगणारा हा कातकरी समाज नेहमीच उपेक्षीत राहत राहीला. पवन मावळातील चावसर येथील गरजू बांधवांना बजरंग दल मावळ च्या वतिने रविवार (दि.८) रोजी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. 
यावेळी ॲड भरत ठाकर प्रतिष्ठाणचे संस्थापक ज्ञानेश्वर ठाकर, दत्ता गोणते, शाम शिंदे सिताराम पवार सतीश ठाकर,क्षत्रगुण धनवे,संयोजक प्रशांत ठाकर,विश्वास दळवी,दत्ता ठाकर,आकाश ठाकर, सुधीर दहिभाते,सनी तुपे अमोल वरघडे, यांच्या सह आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!