वडगाव मावळ:
अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या
मावळ तालुका उपाध्यक्ष पदी निगडेच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सविता भांगरे यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी भांगरे यांना निवडीचे पत्र दिले. आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
सविता भांगरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे. त्या टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.सरपंच परिषदेच्या कार्याध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
सरपंच सविता भांगरे म्हणाल्या,” माझ्यावर जबाबदारीने दिलेल्या सर्व पदांना न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजकारणाला राजकारणाची जोड असल्या शिवाय विकासाची गती वाढत नाही.आपण समाजाचे देण लागतो या भावनेतून माझे कार्य सुरू आहे.संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण पुढाकार घेईन.

error: Content is protected !!