पुणे:
आयुर्वेद हे एक अत्यंत प्राचीन ,उपयुक्त आणि मानवाच्या इतिहासाशी वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडलेले महत्त्वाचा शास्त्र आहे. याबाबत बरेच वर्ष लोकांना माहिती होती तरी त्याचा बहू प्रकाराने उपयोग कसा करायचा ,त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे घेऊन जायचे , त्यासोबत सर्वसामान्यांना योग्य त्या प्रकारे समजून सांगायचे अशी अनेक कामं आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी केली. विशेषतः सोप्या मराठी भाषेमध्ये आयुर्वेदाचे निरूपण करणे त्याचबरोबर प्रत्यक्ष उपचारातुन लोकांना फरक कळायला लागणे अशाप्रकारे देशोविदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करून त्याला लोकप्रिय बनवणे या प्रकारचे काम डॉ.बालाजी तांबे यांनी केले. त्यांचे आज दुःखद असे निधन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. त्यांनी ८० वर्ष पूर्ण केली म्हणून त्याबद्दल त्यांचा सत्कार करायचा असे देखील आम्ही ठरविले होते आणि त्या कार्यक्रमाला मी जाणार होते. परंतु त्या दिवशी अतिवृष्टी महाराष्ट्रात झाली व लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे तो कार्यक्रम पुढे ढकलवा लागला. परंतु नियतीच्या मनामध्ये तो कार्यक्रम होणारच नव्हता याची आम्हाला सुतराम कल्पना आली नाही. आपण धनत्रयोदशी ला भेटू या असे त्यांचे शब्द होते तेच त्यांचे शेवटी मी शब्द ऐकले.
डॉ.तांबे निधनाने आयुर्वेदाची, महाराष्ट्राची, जगातील सर्व वैद्यक शास्त्राची फार मोठी हानी झाली आहे. शिवसेना उपनेता आणि विधानपरिषद उपसभापती या नात्याने मी त्यांच्या दुःखद निघनाबद्दल श्रद्धांजली व्यक्त करते .त्यांच्या परिवार व संस्थेच्या दुःखामध्ये सहभागी आहे. त्याचे आयर्वेदीक विषयक काम चालू रहाण्याच्या दृष्टीकोनातून आमचे कायम तांबे कुटुंबियांना सहकार्य असणार आहे.

error: Content is protected !!