जागतिक आदिवासी दिन मावळ तालुक्यात मोठ्या उत्साहत साजरा
टाकवे बुद्रुक:
बेलज ता.मावळ येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर वर्षाप्रमाणे याही वर्षी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य, बिरसा ब्रिगेड मावळ, बिरसा ब्रिगेड शाखा बेलज व सर्व आदिवासी बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने बेलज गावात जागतिक आदिवासी दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला कान्हेफाटा येथुन आमदार सुनिल शेळके यांच्या हास्ते बाईक रॅलीचे उदघाटन करण्यात आले. येथुन रॅली बेलजकडे किल्लेदार रामजी हारजी मोरमारे व राघोजी हारजी मोरमारे यांची मशाल घेऊन रॅली बेलज गावाला मार्गस्त झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज्यातील जेष्ठ बांधव मारुती वाजे होते. तसेच समाज भुषण डॉ. अजय शंकरराव सुपे पशुवैद्यकिय आधिकारी व आदि. विठ्ठल भोईर साहेब कक्ष आधिकारी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
आदिवासी दिना निमित्त आदि. दिपक कोकाटे साहेब व बिरसा ब्रिगेड मावळच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
मावळ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव मोठ्या आनंदाने व हिरहिरीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला तसेच आदिवासी ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांचे सन्मान ट्रॉफी देऊन करण्यात आला.
प्रमुखवक्ते म्हणुन आशोक बांगर सर महाराष्ट्र राज्य विचार मंच आध्यक्ष म्हणुन उपस्थित होते.
प्रस्तावना सागर तळपे सर यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहन ( बाबुराव) वाजे व अजय बुरुड यांनी केले. आभाराचा गोड कार्यक्रम शिरदे गावचे सरपंच दिलिप बगाड यांनी केले.

error: Content is protected !!