वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक ४ मधील रखडलेली ३२(१) ची प्रक्रिया पूर्ण करा अथवा भूसंपादन रद्द करुन सातबारा उताऱ्यावरील औद्योगिकीकरणाचे शिक्के काढुन चार वर्षांची शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्या या मागणीसाठी शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने आंबी येथील चौकात अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
आंदोलनात कुठलाही ठोस निर्णय न घेता स्थगित करण्यात आले या आदोलनाला एमआयडीसी चे कुठलेही अधिकारी उपस्थित नसल्याने त्याचा निषेध करुन येत्या पंधरा दिवसात ३२(१) बाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष शातांराम कदम यांनी दिला
या आदोंलनात माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनिल शेळके, मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती निकीता घोटकुले , कृति समितीचे अध्यक्ष शांताराम कदम , जि प सदस्य नितीन मराठे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, निवृत्ती शेटे रविद्र भेगडे, संदीप काकडे,शिवाजीराव पवार, सुनील भोंगाडे, मोहन घोलप , दत्तात्रय पडवळ, गणेश भांगरे, भिकाजी भागवत,, संतोष जाचक, मधुकर धामणकर, पंढरीनाथ पिंगळे, मोहन घोलप, दिगंबर आगीवले, रामदास चव्हाण, रामदास शेटे, आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .
सन २०१७ मध्ये निगडे, आंबळे, कल्हाट व पवळेवाडी या गावांमध्ये एमआयडीसी टप्पा ४ जाहीर झाला त्यानंतर संबंधित चारही गावच्या सातबारा उताऱ्यांवर संपादनाचे शिक्के पडले, सन २०१८ मध्ये दरही निश्चित केला परंतु दर निश्चित होहुनिही ३२(१) प्रकिया पुर्ण न झाल्याने शेतकर्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. तसेच यापुढे मात्र काहीच कार्यवाही झाली याबाबत अनेक शेतक्रयांनी तिव्र भावना व्यक्त केल्या .यावेळी मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना समितीच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले.कृती समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी प्रास्ताविक केले. सरपंच मोहन घोलप यांनी सुत्रसंचालन केले. माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांनी आभार मानले.

error: Content is protected !!