नवी मुबई:
ऐरोलीतील धक्कादायक घटना
अभ्यासाच्या तगाद्यावरून मुलीने केली आईची हत्या अभ्यासाचा तगादा लावण्यावरून झालेल्या भांडणांमध्ये एका १५ वर्षीय युवतीने आपल्या जन्मदात्या आईचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना ऐरोली मध्ये घडली आहे.
विशेष म्हणजे हत्ये नंतर मुलीने आईने आत्महत्या केल्याचा कट रचला. परंतु पोलिसांच्या चौकशीअंती सत्य घटना समोर आली. ऐरोली सेक्टर ७ येथील एका १५ वर्षीय विद्यार्थी युवतीने आईच्या सततच्या अभ्यासाच्या जाचाला कंटाळवून स्वतःच्याच आईची गळा आवळून हत्या केली आहे. ३० जुलै २०२१ रोजी दुपारी मुलगी अभ्यास करीत नसल्याने आईने मुलीला रागावून मारहाण केली.
दोघींची झटापट होत असताना आईने मुलीच्या डाव्या हाताच्या पंजाला चावा घेतल्याने मुलीने आईला जोरात धक्का दिला असता आईच्या डोक्याला बेडच्या कोपरा लागल्याने मोठी दुखापत झाली व त्या अर्धमेल्या अवस्थेत उठण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलींने आईला जीवेठार मारण्याच्या उद्देशाने बेडवर पडलेल्या कराटे च्या पट्ट्याने आईचा गळा आवळून तिची हत्या केली.
आई मेल्याचे लक्षात येताच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मुलीने आईच्या मोबाईल वरून कुटुंबातील प्रमुखांना Tired of Everything, I Quit असा मेसेज केला व बेडरूम ची चावी काढून बेडरूम मध्ये ठेवून बेडरूम लॅच लॉक च्या साहाय्याने लॉक केले.
याप्रकरणी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता परंतु घटनास्थळी परिस्थितीतून पोलिसांना संशय व्यक्त होत होता. शव विच्छेदन अहवालात त्याची पुष्टी झाल्याने रबाळे पोलिसांनी घरातील लोकांची चौकशी केली असता मुलीनेच आईची हत्या केल्याचे उघड झाले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन व त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने हे प्रकरण उघडकीस आणले. याबाबत अधिक तपास रबाळे पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!