टाकवे बुद्रुक:
येथे समर्थ बुथ अभियान संदर्भात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. येथील बुथ रचना व कमिट्या करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
टाकवे शहर भाजपा शहराध्यक्ष पदी दत्ताराम असवले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच पुणे जिल्हा वनपरिक्षेत्र कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी कोंडीभाऊ जांभूळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
मावळ भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे,अनंता कुडे, राजू शिंदे,सदाशिव जांभूळकर,राजाराम असवले,काळूराम घोजगे, रोहिदास असवले, विकास असवले,काळूराम असवले, तुकाराम कोद्रे, मुन्नावर आत्तार, काशीनाथ जांभुळकर,प्रदीप मोढवे,चेतन लोंढे, राजू लोंढे, साहेबराव आंबेकर, आदिनाथ जांभुळकर,विठ्ठल तुर्डे, सिद्धेश लोंढे उपस्थित होते.

error: Content is protected !!