
आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिम
वडगाव मावळ:
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून गरुडझेप घेतली .छत्रपती शिवाजीमहाराज सुखरूप स्वराज्यात परतले. याच इतिहासाची जाण ठेवून तरुण मावळ्यांनी छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट रोजी शिवज्योत घेऊन पायी ‘आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम-२०२१’ नियोजित केली आहे.
तरुणांच्या या धाडसी मोहिमेला मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मारुती गोळे, फर्जंद व फत्तेशिकस्त चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, लेखक सौरभ करडे, शिवव्याख्याते रवींद्र यादव मोहिमेत सहभागी होणारे आपल्या मावळ तालुक्यातील युवक गणेश जाधव, नितीन चव्हाण, श्रीनिवास कुलकर्णी, अंकेश ढोरे, रवींद्र विनोदे, हनुमंत जांभूळकर, अशोक सरपाटील, सुमित लिंबोरे, विशाल शिंदे, अतुल ढोरे, व इतर सदस्य उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे



