शिवसेनेने वाहिली स्वतंत्र पणे श्रद्धांजली
पवनानगर:
९ऑगस्ट२०११ रोजी झालेल्या अमानुष गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या मोरेश्वर साठे , कांताबाई ठाकर, श्यामराव तुपे यांना शिवसेनेने येळसे येथील स्मारकावर जाऊन स्वतंत्रपणे श्रद्धांजली वाहिली .
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर म्हणाले,” जो पर्यंत ही बंद जलवाहिनी योजना रद्द होत नाही.तोपर्यंत शिवसेना स्वतंत्र पणे आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवरील संपादित शिक्के काढावे यासाठी पाठपुरावा करणार आहे .जखमी ना नोकरी मिळावी म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार आहे .
उपतालुका प्रमुख अमित कुंभार यावेळी म्हणाले ,” पवना बंदिस्त योजना रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच २००८चा अजून एक गुन्हा शेतकऱ्यांच्या वर दाखल आहे तो काढावा , शहिदाना जर खरी श्रद्धांजली दयायची असेल तर हा प्रकल्प कायमचा रद्द करावा.
यावेळी जिल्हा नियोजन सदस्य शरद हुलावळे, विभाग प्रमुख उमेश दाहिभाते ,संतोष शिंदे ,अनिल भालेराव, रमेश जाधव ,पोपट राक्षे, उमेश ठाकर ,सुरेश गुप्ता,विकास कालेकर ,प्रवीण वैष्णव,शंकर दळवी, सनी मोहिते, सचिन कलेकर, किशोर शिर्के, जयदीप कुंभार, देवा कांबळे उपस्थित होते.

error: Content is protected !!