पवनानगर:
पवना ही मावळच्या शेतकऱ्यांची अस्था आणि अस्मिता आहे. तिच्या पाण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी प्राणपणाला लावून, स्वतःचे बलिदान दिले.त्यांचे बलिदान वाया जावू देणार नाही. कोणीही , कितीही, प्रयत्न केले तरीही बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णयावर ठाम असून, तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही , अशी आक्रमक भूमिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मांडली.
पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झालेल्या मावळ गोळीबाराच्या घटनेला १०वर्षे पूर्ण झाले. या गोळीबारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या १०व्या स्मृती दिनानिमित्त येळसेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी राज्यमंत्री भेगडे बोलत होते.
त्यापूर्वी येळसे गावातून स्मृतीज्योत प्रज्वलित करून गोळीबारात बळी गेलेल्या शेतकरी कांताबाई ठाकर, शामराव तुपे, मोरेश्वर साठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी सभापती एकनाथराव टिळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,माजी उपसभापती जिजाबाई पोटफोडे,संचालक शिवाजीराव पवार,जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले,युवाध्यक्ष संदीप काकडे,प्रशांत ढोरे,बाळासाहेब घोटकुले,संदीप भुतडा,गणेश ठाकर,मुकुंद ठाकर,ललिता साठे,अनंता कुडे व शहिद कुटुंबातील सदस्य आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!