पिपरी:
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी ठाकर /ठाकुर जमात सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य,आदिवासी कोळी समाज संघटना,आदिवासी कोळी महासंघ,आदिवासी कोळी अॕक्शन रॕपिड फोर्स महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी येथे सर्व जमातीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालुन जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कोळी समाजाचे अध्यक्ष डि एम कोळी,आदिवासी ठाकर /ठाकुर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड,आदिवासी ठाकुर जमात सेवा मंडळ पुणेचे अध्यक्ष पंढरिनाथ अहिरे,दिलीप देवरे व ईतर जमात बांधव उपस्थित होते आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगत करण्यात आली.

error: Content is protected !!