समुद्रमंथन ची गोष्ट आपल्याला माहीतच आहे
त्याचा मला जसा समजला तसा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते.अमृत मिळवण्यासाठी देवांनी दानवांशी हातमिळवणी केली.तसं आपल्यालाही सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल.देतो तो देव,गीतेमध्ये देव कोणाला म्हणतात ते सांगितले आहे.
आणि राक्षस म्हणजे जे म्हणतात आम्ही आमचं रक्षण करू.आजही AC मध्ये बसून चर्चा करणारे कुठे आहे देव आम्ही निसर्ग मानतो.आम्हाला विज्ञान कळतं.अमृत म्हणजे सुखी होण्याची गुरुकिल्ली मानवाला सुखी होण्यासाठी समृद्धी आणि संपन्नता दोन्हीही आवश्यक आहे.
समृद्धी म्हणजे भौतिक समृद्धी आणि संपन्नता म्हणजे गुण संपत्ती .काय करायचं हे सांगता येईल म्हणजे कोणकोणते गुण जीवनात आणायचे हे गीतेत सांगितलंय कसे आणायचे हे प्रत्येकाने ठरवायचय.
थोडक्यात आज विविध धार्मिक प्रवाह दिसून येतात. कोणी ज्ञानेश्वरी चे अभ्यासक आहेत.कोणी गीता,कोणी भागवत,दासबोध आणि अजून काय काय आपल्या सर्वच ग्रंथांमध्ये मार्गदर्शन आहे.शब्द वेगळे असतील,अर्थ सारखाच आहे.आपण अभ्यासले पाहिजेत.( शब्दांकन- नंदा पाटील)

error: Content is protected !!