वडगाव मावळ: ‘ कर्म हाच देव’ असे मानणाऱ्या थोर संत सावतामाळी महाराज यांची पुण्यतिथी शेलारवाडी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कांदा मुळा भाजी,अवघी विठाबाई माझी’ असे म्हणत ‘कर्म हाच देव’ असे मानणाऱ्या थोर संत सावतामाळी महाराज यांची ७२६ वी पुण्यतिथी शेलारवाडी ता.मावळ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…सकाळी श्री.संत सावतामाळी मित्र मंडळाच्या वतीने श्री.सावतामाळी महाराजांच्या मुर्तीला अभिषेक करण्यात आला..श्री.बाळासाहेब माळी यांनी मंदिरास फुलांनी सजवल्याने वातावरणात प्रसन्नता आली होती..दुपारी वड,चिंच,बोर,पिंपळ,लिंब इ.२५ वृक्षांचे वृक्षारोपण शेलारवाडी येथील पवित्र इंद्रायणी नदी तीरावर करण्यात आले…यावेळी सर्वश्री लक्ष्मण माळी,दत्तात्रय माळी,नंदकुमार माळी,बाळासाहेब शेलार,संदेश भेगडे,अतूल शेलार,मनोहर दरवडे,प्रा.लक्ष्मण शेलार,प्रा.किरण माळी इ.मान्यवर उपस्थित होते..वृक्षारोपण केलेल्या सर्व रोपांना वेळोवेळी खत व पाणी देऊन त्यांचे जतन व संवर्धन करणार असल्याचे मत योगेश माळी व किशोर माळी यांनी व्यक्त केले…सायंकाळी मंदिरासमोर सत्यनारायणाच्या महापुजेचे व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले..रात्री शेलारवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ यांचे सुश्राव्य भजन झाले…विठूरायाच्या जयघोषात सारेच मंत्रमुग्ध झाले होते…पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्वश्री सुहास माळी,उत्तम माळी,विनोद माळी,अंकूश माळी,शरद माळी,चंद्रकांत माळी,मृणाल माळी,राजूशेठ माळी,मयूर जाधव,संजय माळी,संतोष माळी,तुषार माळी,पै.वैभव माळी यांनी परिश्रम घेतले…भविष्यात मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करुन समाजकार्य जोपासण्याचा मनोदय मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला..

error: Content is protected !!