पवनानगर: धनगव्हाण गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते पैलवान शाहिदास लक्ष्मण घारे (वय. ६२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार असून शरद घारे यांचे वडील तर पी. एम. पी. एल सांप्रदायिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण काळे यांचे ते मामा होत तर माजी सरपंच भरत घारे यांचे ते चुलते होत
पवनामावळातील ते नामांकित पैलवान म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या काळात त्यांनी अनेक मैदाने गाजवली अनेक सांप्रदायिक व सामाजिक कार्यात नेहमी ते अग्रेसर असत त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!