मुंबई : 
राज्यात कोरोनाचे नियम शिथिल झालेल्या २५ जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पाचवी इयत्ते पुढील सर्व वर्गाच्या शाळा सुरू होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे सुतोवाच केले आहे.
सरकारने २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नियम शिथिल केले असल्याने या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे, अशा महापालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या पाचवी ते पुढील वर्गाच्या शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या ग्रामीण भागातील शाळा आणि आठवी ते बारावीपर्यंतच्या शहरी भागातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत.

error: Content is protected !!