वडगाव मावळ:
‘मदत नाही कर्तव्य ,एक हात मदतीचा’ या दृष्टिकोनातून युवा पर्व फाउंडेशन मावळ व कैलास भाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने महाड चिपळूण येथील अकले व कळंबवाडी या गावातील पूरग्रस्तांना अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले.
युवा पर्व फाउंडेशन चे सर्व सहकारी त्यांनी जाऊन तेथील गावांमध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलासभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. पुढील काळामध्ये देखील कुठे अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर युवा पर्व फाउंडेशन च्या वतीने मदत केली जाईल असे गायकवाड यांनी सांगितले
यावेळी उपाध्यक्ष किरण यादव, उपसरपंच सागर येवले, सदस्य बाबाजी चोपडे, अंकुश चोपडे, वैभव शिंदे, सुनील गायखे, नितीन गायकवाड, अनिकेत शिंदे प्रवीण नवघणे, प्रवीण शिंदे, मयूर चोपडे भाऊसाहेब चोपडे ,सोमनाथ शेवाळे चेतन गायकवाड, शेखर चोपडे आदी सहकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!