टाकवे बुद्रुक:
कोरोना संकटाच्या काळात आरोग्यदूतांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाने माणसूकी शिकवली. कोरोना पाठोपाठ आलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपलेपणाची भावना दिसली. समाजात राबणा-या हातांचा सातत्याने आदर केला पाहिजे असे गौरवोद्गार टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले यांनी काढले.
टाकवे बुद्रुक येथील आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,पोलीस पाटील,पोलीस, वायरमन,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, पत्रकार, रेशन दुकानदार, बँक अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी झालेल्या कार्यक्रमात सरपंच भूषण असवले बोलत होते.
हपीचंद पांडुरंग असवले व बबन शंकर जांभुळकर यांचा सेवा निवृत्तीनिमित विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच सत्तू दगडे, सदस्य सोमनाथ असवले,सदस्य ऋषीनाथ शिंदे, सदस्य परशुराम मालपोटे माजी उपसरपंच अविनाश असवले, अनिल मालपोटे, शेखर मालपोटे, बाबाजी मालपोटे, पोलीस पाटील अतुल असवले, शिक्षक नारायण असवले, सदस्या सुवर्णा असवले
प्रतिक्षा जाधव, प्रिया मालपोटे, संध्या असवले ज्योती आंबेकर, जिजाबाई गायकवाड, आशा मदगे, महादु गुनाट,. बाबाजी असवले, ग्रामसेवक एस बी बांगर. वायरमन निहाल पठाण उपस्थित होते.
मारुती असवले यांनी सूत्रसंचालन केले. आभार ज्योती आंबेकर यांनी मानले.

error: Content is protected !!