टाकवे बुद्रुक:
माऊ येथील सावित्रीबाई गोपाळराव जगताप (पाटील) (वय ८७ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
माऊ येथील कै.गोपाळराव जयतू जगताप पाटील, गावचं कारभारी. तालुक्यात मोठे नाव. जनसंघाचे विचार त्यानी आयुष्यभर जपले.त्याच्या पत्नी श्रीमती. सावित्रीबाई गोपाळ जगताप यांनी संसाराचा डोलारा आपल्या खांद्यावर घेत आपल्या मूल व मुलींची जबादारी संभाळली.
श्री.मच्छिद्र गोपाळ जगताप हे व मावळ भाजपाचे उपाध्यक्ष व श्री.एकनाथ जगताप हे हाडाचे शेतकरी.
सावित्रीबाई यांनी आपलं मोठं कुटुंब एकत्र ठेवत आणि ते ठेवत असताना आपण समाज्याला काही देणं लागतो याची जाणीव ठेवत आयुष्यभर जपली.

error: Content is protected !!