पवना नगर :
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पुन्हा एकदा कृती समितीने दिला. पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध करण्यासाठी शेतक-यांनी दहा वर्षापूर्वी एक्स्प्रेस वे वर अंदोलन घेतले होते. या अंदोलनात तीन जणांचा बळी गेला होता
तेव्हा पासून बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणूकीच्या तोंडावर या प्रकल्पाबाबत फक्त आश्वासने दिली जात आहे. या आंदोलनात झालेल्या गोळीबारात तीन शेतकर्यांनचा मृत्यु झाला होता तर १३ जण गंभीर जखमी झाले होते. या अंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरवर्षी ९ ऑगस्टला येथे आदरांजली वाहण्यात येते,याही वर्षी आदरांजली वाहण्यात येणार आहे. या बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला अद्यापही पूर्णपणे स्थगिती मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर “पवना बंद जलवाहिनी कृती समीती”च्या वतीने घेतलेल्या बैठकीत पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला पूर्णपणे स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आमचा कायम लढा सुरु राहणार असल्याचा इशारा समितीने दिला.
समितीने शासनाकडून अद्याप एकही मागणी पूर्ण झाली नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी पवना बंद जलवाहिनी कृतीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी , भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, गणेश धानिवले, बाळा घोटकुले, नितिन घोटकुले, किरण राक्षे,अंकुश पडवळ, बाळासाहेब जाधव, किसन घरदाळे, नारायण बोडके, किसन खैरे, बबन कालेकर, अनंता वर्वे, ज्ञानेश्वर आडकर, ज्ञानेश्वर ठाकर, वसंत काळे, गणेश ठाकर,संतोष दळवी, सचिन मोहिते, विकास दहिभाते, गणेश साबळे उपस्थित होते.

error: Content is protected !!