वडगाव मावळ:
पुणे जिल्हा व मावळ तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोड बाधीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांची बैठक झाली.
पुणे जिल्हा तसेच मावळ तालुकयातील विविध भागातील शेतकरी रिंगरोड बाबतीत संभ्रमावस्थेत आहे.शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असून मावळ तालुक्यातील जास्तीत जास्त भाग हा बागायती क्षेत्र असून त्यातून अनेक शेतकरी बाधीत होणार आहे.या शेतक-यांचे बागायती क्षेत्र वगळण्यात यावे, ही शेतक-यांची मागणी भेगडे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
शेतकरी व प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक घेऊन रिंगरोड हा विषय सकारात्मक पद्धतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख यांना पुणे व मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री बाळा भेगडे यांनी निवेदन देऊन मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देत लवकरात लवकर संयुक्त बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
पुढील काळात शेतकऱ्यांचे प्रश्नाबाबत सरकार योग्य ती भूमिका घेत नाही.तो पर्यंत रिंगरोडची मोजणी होवू देणार नसल्याची भूमिका भेगडे यांनी घेतली.

error: Content is protected !!