तळेगांव स्टेशन:
यशवंतनगर येथील जानकी रेसिडेन्सीत ई सुविधा केंद्राचे उदघाटन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोरभाऊ आवारे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.विशाल कुकडे डॉ. दीपक ढवळे ,डॉ यशवंत वाघमारे,मावळ फेस्टिवल चे माजी अध्यक्ष जितेंद्र कुडे,श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर,डॉ विशाल पाटील, मा नगरसेवक सुनिल पवार,दैनिक महाराष्ट्र क्रांती चे संस्थापक अनिल भांगरे, अमोल आंबेकर, आकाश मराठे उपस्थित होते.
या केंद्राचे संचालक अक्षय घरदाळे,प्रसाद कालेकर यांनी येथे दिल्या जाणा-या कामांची आणि सुविधांची महिती दिली.
जनसेवा समितीचे संस्थापक किशोर आवारे म्हणाले,” तळेगाव स्टेशन व परिसरातील नागरिकांना व वयोवृद्ध लोकांना या कार्यलयातुन होणाऱ्या ऑनलाइन व शासकीय कामांची गरज पूर्ण होईल.

error: Content is protected !!