वडगाव मावळ:
आदिवासी बांधवाना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असा विश्वास मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत मावळ तालुक्यातील १३७१ आदिवासी कुटुंबांना आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते खावटी अनुदान योजनेतील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार शेळके बोलत होते. टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच भूषण असवले, उपसरपंच संतू दगडे, ज्येष्ठ नेते काळूराम मालपोटे , संजय गांधीनिराधारयोजनचेअध्यक्षनारायणठाकर, माजी संचालक अंकुश आंबेकर ,, आंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारूती असवले,कान्हेचे सरपंच विजय सातकर, माजी सरपंच तुकाराम असवले,माजी सरपंच दत्तात्रय पडवळ ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, भाऊ बोराडे, श्रीकृष्ण दहिफळे, पांडुरंग माळी, दादासाहेब सीताफळे तसेच स्थानिक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
या योजनेअंतर्गत आदिवासी कुटुंबांतील पात्र लाभार्थींपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचवण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या. पुढील काळात आदिवासी बांधवांसाठीच्या शासकीय विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही आमदार शेळके यांनी सांगितले. 

error: Content is protected !!