पुणे:
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला आहे. हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे.
बेलसर गावातील एका पन्नास वर्षांच्या महिलेस झिका झाल्याचा चाचणी अहवाल शुक्रवारी प्रयोगशाळेने दिला. या महिलेला चिकनगुनियाचीही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
हा मिश्र विषाणू संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. झिकाची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली आहे. तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.

error: Content is protected !!